राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुधागड मनसेतर्फे नुकतेच सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले. तसेच राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुधागडातील सामाजिक कार्यकर्ते राजू जोशी यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. येथील आनंदधाम वृद्धाश्रमातील वृद्ध व कर्मचारी तसेच जांभूळपाडा पोलीस स्थानकातील पोलीस यांच्याशी संवाद साधण्यात आला.

यावेळी रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या हस्ते त्यांना छत्री वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी वाडीत खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला लता कळंबे, सुनील साठे, सचिन झुंजारराव,शेखर चव्हाण, परेश वनगले, भावेश बेलोसे, अजिंक्य पशिलकर, राजेश कदम, केवल ठक्कर व रोशन कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version