| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील भवानी मंदिरात सखी मंचतर्फे संस्थापिका स्मिता खेडेकर यांच्या प्रेरणेतून नवरात्रौत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. सुरुवातीला सर्व उपस्थित महिलांनी भवानी मातेची पारंपारिक आराधना करुन फेर धरला. यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध भजनी बुवा विद्याधर चोरघे यांना रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल, निवृत्त शिक्षिका सुगंधा दळवी, प्रतिक्षा निरकर, रजनी जोशी, निलम घरत व निवृत्त आरोग्य सेविका सुषमा रणदिवे, निता दळवी यांचा स्मिता खेडेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विनोद दळवी नरेंद्र चोरघे, पुजारी मनोज नवाले उपस्थित होते.
सखी मंचतर्फे नारी शक्तीचा जागर
