| रसायनी | प्रतिनिधी |
पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुका अध्यक्ष अर्जुन कदम यांच्यावतीने रिलायन्स फाऊंडेशन, रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यावतीने चौक ग्रामीण रुग्णालयात पॅप स्मिअर तपासणी, स्तन तपासणी शिबिर, तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात औषधी वृक्षारोपण करण्यात आले. खालापूर तहसील कार्यालय यांच्याकडून नवीन आधारकार्ड, रेशनकार्ड दुय्यम प्रत देण्यात आली. ग्रामीण रुग्णालय चौक यांच्या सहकाऱ्याने कुपोषित माता बालक यांची तपासणी करून रुग्णालय व पत्रकार संघ यांच्या वतीने पौष्टिक आहार वाटप करण्यात आले. याप्रसंगी चौक प्रभारी पोलीस अधिकारी विशाल पवार, रवींद्र कुंभार, प्रशांत देशमुख, संतोष विचारे, डॉ.रणजित खंदारे, डॉ. विष्णू बुलबुले, डॉ.तेजस्विनी, डॉ.राऊत, डॉ. यादव, माणिक सानप, गणेश मोरे, विश्वास वारे, रामदास काईनकर, जग्गू हातमोडे, विष्णू खैर, प्रकाश जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, लाभार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व पत्रकार, ग्राम पंचायत चौक, तुपगाव यांचे कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय चौक यांचे सर्व अधिकारी कर्मचारी, महिला व बाल विकास विभाग यांनी मेहनत घेतली.






