| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील तळवलीतर्फे अष्टमी येथील मरवडे परिवारातर्फे दि. 27 रोजी विविध प्रकारचे धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने संपन्न करण्यात आले. येथील मरवडे परिवारातर्फे मागील 15 वर्षांपासून कुलदेवतेचा उत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दि.27 रोजी आयोजित करण्यात आलेल्या कुलदेवता उत्सवानिमित्त सत्यनारायणाची महापूजा, महाआरती, हळदीकुंकू, खांब पंचक्रोशी व ग्रामस्थ मंडळाचे हरिपाठ, रायगडभूषण पुरूषोत्तम महाराज पाटील यांची हरिकीर्तनरूपी सेवा, महाप्रसाद आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले.