पाताळगंगामध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम

। रसायनी । वार्ताहर ।
रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या नवीन वर्षाची सुरवात विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने झाली. रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, डॉक्टर्स डेच्या निमित्ताने रसायनी पाताळगंगा परिसरातील सर्व डॉक्टरांचा सन्मान असे कार्यक्रम आयोजित केले होते. रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा, प्रायमा आणि संपूर्ण रेगे हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण रेगे हॉस्पीटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 66 रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच मोहोपाडा तलावाच्या शेजारी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाने वृक्षारोपण केले. क्लबच्या 35 व्या वर्षात पदार्पण केल्या निमित्त 35 झाडे विविध मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. डॉक्टर्स डेच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाने रसायनी पाताळगंगा परिसरातील 25 वर्षाहून अधिक सेवा देणार्‍या डॉक्टरांचे त्यांच्या क्लिनिकमध्ये जावून त्याचा सत्कार करण्यात आला. सदरकार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळकृष्ण होनावळे यांनी केले.

Exit mobile version