मजगांव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आघाडीच्या वर्षा गोयजी बिनविरोध

। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यात 21 डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत मजगांव ग्रामपंचायतीतील प्रभाग-2 मधील उमेदवार जना रमेश वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप आघाडीच्या उमेदवार वर्षा योगेंद्र गोयजी बिनविरोध निवडून आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप आघाडीचे ज्येष्ठ नेते अरविंद भंडारी, तालुका पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत कमाने, नरसिंह मानाजी, ग्रामपंचायत सदस्य आतिष आयकर तसेच कळत न कळत सहकार्य करणार्‍या सर्वांचे विद्यमान सदस्य योगेंद्र गोयजी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत, महिला अध्यक्षा अ‍ॅड.मृणाल खोत, नगरसेविका प्रमिला माळी, नगरसेवक बाबा दांडेकर, सावली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रभाकर पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या नम्रता अजित कासार, बोर्ली ग्रामपंचायत सरपंच चेतन जावसेन आदींनी वर्षा गोयजी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version