। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील श्री क्षेत्र विठोबा देवस्थान ट्रस्टच्यावतीने आषाढी एकादशी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि.17) सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास काकड आरती, महाभिषेक होणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भजनांचा कार्यक्रम होणार आहे. वेश्वी येथील श्री गोकुळेश्वर भजन मंडळ, कार्ले येथील श्रीपंत महाराज प्रासादिक भजन मंडळ, कर्जत-खालापूरमधील स्वर वैभव संगीत भजन होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी श्रुती बोंद्रे यांचे किर्तन तसेच आरती होणार असून उरणमधील वेश्वी येथील संदीप कडू यांचे भजन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.







