| रसायनी | वार्ताहर |
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप मुंढे यांच्या संकल्पनेतून वासांबे प्रिमिअर लिग 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. 15 डिसेंबरपासून या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या वासांबे प्रिमिअर लिगचा ऑक्शन सोहळा वरद टॉवर्समध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर , सुरेश पाटील यांच्या हस्ते ऑक्शन सोहळयाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी दीपक कांबळी, अजूशेठ सावंत, दत्तात्रेय जांभळे, प्रकाश गायकवाड, श्री. गुप्ता, अल्कील अमाईन्सचे मॅनेजर कल्पेश पाटील, उद्योजक भानूशेठ देशमुख, सनदी लेखपाल दिपक चौधरी, सुदामशेठ मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे माजी सरपंच संदीप मुंढे यांनी शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवून स्वागत केले.
यावेळी उपस्थित 12 क्रिकेट टीमच्या कर्णधारांनी वासांबे परिसरातील खेळाडूंची बोली लावत आपल्या संघात त्यांना सामावून घेतले. यावेळी परिसरातील 246 क्रिकेट खेळाडूंनी ऑक्शनसाठी नामांकन केले होते. रायगड जिल्ह्यातील सुप्रसिध्द समालोचक टी. के. माळी, संतोष चौधरी, रोशन पाटील, निखिल बाबर यांनी उत्कृष्टरित्या या ऑक्शन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. डिसेंबरच्या दुसर्या आठवडयात मोहोपाडा येथील अचानक मैदानावर वासांबे प्रिमिअर लिग संपन्न होणार असून एकूण 12 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.