| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील देहेन गावचे रहवासी वासुदेव काशिनाथ पाटील यांचे 30 डिसेंबर रोजी निधन झाले. निधना समयी ते 73 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण देहेन परिसरावर शोककळा पसरली. त्यांच्यावर देहेन गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे, सूना असा मोठा परिवार आहे. यांचे उत्तरकार्य दहावा सोमवार 8 जानेवारी रोजी, तर तेरावे गुरुवार 11 जानेवारी रोजी राहत्या घरी होणार असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.







