वक्तृत्व स्पर्धेत वेदिका भोसलेची बाजी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन संस्था वतीने वक्तृत्व स्पधेचे आयोजन संस्थाचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या स्पर्धेत नगरपरिषद मराठी शाळा, सर एस.ए. हायस्कूल, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत पहिली ते चौथी गटाकरिता ‌‘शिवरायांचे बालपण’ हा विषय देण्यात आला होते. यामध्ये वेदिका संदेश भोसले हिने प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक चिन्मयी गणेश मेस्त्री, तृतीय क्रमांक हर्षाली नरेश भोईर हिने पटकावला.

पाचवी ते सातवी गटात ‌‘शिवरायांची युद्धनीती’ हा विषय देण्यात आला होता. यामध्ये विदिशा दत्तात्रेय म्हात्रे प्रथम, दुर्वेश प्रमोद तांबडकर द्वितीय, तर तृतीय क्रमांक काव्या किशोर माळी हिने पटकावला. आठवी ते दहावी गटात ‌‘शिवकालीन गडकिल्ल्यांचे महत्त्व व संवर्धन’ हा विषय देण्यात आला होता. यामध्ये प्रथम क्रमांक सान्वी प्रशांत गुंजाळ, द्वितीय सृष्टी संजय भगत, तृतीय क्रमांक श्रावणी सचिन गोयगी हिने प्राप्त केला. अकरावी ते पंधरावी च्या गटासाठी ‌‘आज छत्रपती शिवाजी महाराज असे तर’ हा विषय देण्यात आला होता. यामध्ये रोशनी रवींद्र म्हात्रे प्रथम, द्वितीय क्रमांक रिध्दी राजेश भगत, तृतीय क्रमांक सुजल देवेंद्र गायकर यांनी पटकाविला. विजेत्यांना राहुल कासार, महेंद्र मोहिते, प्रमोद मसाल, विजय वाणी यांच्याकडून प्रशस्तीत्रक, गुलाब पुष्प व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version