प्रज्ञाशोध परिक्षेत तालुक्यात तिसरी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील खारगल्ली-नागांव येथील वेदिका प्रवीण पाटील या विद्यार्थीनीने आपल्या बुद्धीमतेच्या जोरावर भरारी घेतली आहे. नुकत्याच झालेल्या प्रज्ञा शोध परीक्षेत तालुक्यात तिसरा आणि रायगड जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांच्याकडून अभिनंदन व कौतूक करण्यात आले आहे. वेदिका ही मराठी शाळेतील विद्यार्थीनी आहे. प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये एकूण 3800 विद्यार्थ्यांमध्ये रायगड जिल्ह्यात पाचवा आणि अलिबाग तालुक्यामध्ये तिसरा क्रमांक मिळवला मिळविला आहे. खारनागांव शाळेतील सर्व शिक्षक व तिचे आई वडील यांचेही अभिनंदन करीत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.