कोरोनामध्ये भाजीपाला महागला

ग्राहकांसाठी दुष्काळात तेरावा महीना
। अलिबाग । वार्ताहर ।
कोरोनाच्या काळात दिवसेंदिवस सगळ्याच वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. तसेच अनेक जिल्हे अनलॉकही झाले आहेत. मात्र, बर्‍यापैकी लॉकडाऊन उठताना दिसत असले तरीही पावसाळ्यात भाज्यांची आवक कमी झाली असल्याने भाज्यांचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटात भाज्यांची दरवाढ ही ग्राहकांसाठी दुष्काळात तेरावा महीना ठरत आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांप्रमाणे अलिबाग बाजारपेठेतही भाज्यांचे दर वाढलेेले दिसून येत आहेत. कोरोनाच्या संकटात अनेक प्रकारच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले आहेत. भाज्यांचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्यामुळे दुधाची तहान ताकावर असे म्हणत गृहीणींनी घरातील कडधान्ये आणी डाळी करण्यावर भर दिला आहे.
सध्याचे भाव

नाव सध्याचा दर आधीचा दर

Exit mobile version