। मुंबई । प्रतिनिधी ।
ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात त्यांचं निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री आजाराशी झुंज देत होते. पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. काही वर्षांपूर्वी मधू कांबीकर यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन
