। रोहा । प्रतिनिधी ।
सुधागड एज्युकेशन सोसायटीतील सेवक वर्ग सहकारी पतसंस्था मर्यादित पालीच्या अध्यक्षपदी वेत्रवान गुरव व उपाध्यक्षपदी हणमंत चव्हाण यांची नियुक्ती बिनविरोध करण्यात आली.
सु.ए.सो. पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष रविंद्र घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याने पुढील तीन वर्षाकरिता हि निवड करण्यात आली आहे. पतपेढीची स्थापना झाल्यापासून ते आजपर्यंत पतपेढीचे कामकाज सुरळीत चालू आहे. यापुढेही पतपेढीची उत्तरोत्तर प्रगती होत राहिली पाहिजे, असा विश्वास संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आला. तसेच, पतपेढीचे काम काटेकोर सुरु आहे आणि यापुढेही राहील, असा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष वेत्रवान गुरव व उपाध्यक्ष हणमंत चव्हाण यांनी व्यक्त केला.