कार्यकर्त्यांना विश्वास; पुरुषोत्तम भोईर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
| पनवेल | रुपाली घरत-वर्तक |
शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व असलेल्या विचुंबे ग्रामपंचायतीची निवडणूक ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या विकासकामांच्या बळावर पुन्हा जिंकणार, इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढविणार असून आघाडी तर्फे थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत उतरलेले उमेदवार पुरषोत्तम उत्तम भोईर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पनवेल तालुक्यातील विचुंबे ग्रामपंचायतीचे मतदार रविवारी (दि.5)पार पडणार आहे. प्रतिष्ठेची ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायत हद्दीत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या विकासकामांमुळे ग्रामपंचायत हद्दीत मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने गावाबाहेरील नागरिकांनी ग्रामपंचायत हद्दीतील इमारतींमध्ये घरे घेणे पसंत केले आहे.
परिणामी, गावाचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. 7 हजाराच्या आसपास मतदार संख्या असलेल्या विचुंबे ग्रामपंचायतीत 5 प्रभागातुन शेतकरी कामगार पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी कडून 15 उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर थेट सरपंच पदाकरता पुरषोत्तम बबन भोईर हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शेतकरी कामगार पक्ष प्रणित पुरोगामी युवक संघटनेच्या पनवेल तालुका अध्यक्ष पदाच्या माध्यमातून पुरषोत्तम भोईर यांनी तरुणांच्या समस्या, तसेच विविध सामाजिक प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चे, आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद भूषवताना गावाच्या सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
प्रशासनावर मजबूत पकड असलेल्या भोईर यांनी परिसरात सुशासन अबाधित ठेवण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. न्यू इंग्लिश स्कुलच्या चेअरमन पदाचा भार सांभाळत गावात शिक्षणाची गंगा आणण्याचे काम देखील भोईर यांनी केले आहे. पुरषोत्तम भोईर यांच्यासोबत प्रभाग क्र. एकमधून सतीश राम म्हात्रे, समीर काळूराम दूंद्रेकर, करुणा उमेश म्हात्रे, प्रभाग क्र. दोनमधून सुनील दुकल्या सोनावणे, भरत दत्ताराम पाटील, स्वाती बळीराम पाटील, प्रभाग क्र. तीनमधून ओमकार बळीराम पाटील, प्राची सुशील भिंगारकर, लता मनोहर गोंधळी, प्रभाग क्र. चारमधून अतुल अनंत भोईर, नम्रता आकाश पाटील, प्रियंका संभाजी भिंगारकर, प्रभाग क्र. पाचमधून धनश्री किरण भोईर, नम्रता आकाश पाटील, संचिता रोशन पाटील हे उमेदवार सदस्यपदाच्या रिंगणात आहेत.
केलेली विकासकामे 1) माझी वसुंधरा,स्वच्छता मोहीम,गावातील पथदिवे लावणे,पाणीपुरवठा योजना राबविल्या. 2) ज्ञानेश्वर माऊली हाउसिंग सोसायटी येथे पाणी शुद्ध करण्यासाठी फिल्टर बसवले. 3) जिल्हा परिषद,पंचायत समिती निधीतून गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे काम पूर्ण केले. 4) 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातील बंदिस्त गटार तयार केले. 5) महिला बालकल्याण योजनेतून गावातील बचत गटांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. 6) नयना आणि तत्सम शेतकरी विरोधी प्रकल्पांना विरोध करून मोर्चे आंदोलनात पाठिंबा व पक्षाच्या माध्यमातून आंदोलन व मोर्चाचे आयोजन केले. 7) विचुंबे गाव परिसरात आरोग्य शिबिर दिवाळीत किल्ले बनवणे स्पर्धा आणि युवकांसाठी क्रिकेट, हॉलीबॉल, मॅरेथॉन सारख्या क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले.
गावात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून गाढी नदीचा दूषित परिसर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ सुंदर करणार आहोत. ग्रामपंचायत हद्दीत कचरामुक्ती करून सांडपाण्यामुळे होणारी अस्वच्छता दूर करणार आहोत. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा, युवकांसाठी खेळाचे मैदान, माजी सैनिकांकरीता सन्मान योजना, नदीवरील पुलाचे रुंदीकरण, पंचायत हद्दीत सीसीटीव्ही लावणे, गावाचा डीपी प्लॅन तयार करणे, महामानवांची स्मारके तयार करणे आदी कामांवर विशेष भर देण्यात येईल.
पुरुषोत्तम बबन भोईर, थेट सरपंच पदाचे उमेदवार
















