पोवाड्यांसह विद्यार्थ्यांकडून नृत्य सादरीकरण; अनेक शिवभक्तांची उपस्थिती
| खोपोली | प्रतिनिधी |
सह्याद्रीच्या कुशीत चावणी (छावणी) येथील उंबरखिंडीत 365 वा विजय दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सकाळी विजय स्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना घेऊन 1661 रोजी कारतलब खानाच्या तीस हजार मुघल सैन्यावर प्रचंड मोठा हल्ला करत मुघल सैन्यांचा दारुण पराभर करत या उंबरखिंडीत मोठा विजय मिळवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कर्तृत्वाला आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी उंबरखिंड येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात विजय दिन सोहळा साजरा करण्यात येतो.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ग्रामपंचायत चावणी, ग्रामस्थ चावणी, जिल्हा परिषद रायगड, पंचायत समिती खालापूर आणि शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्या वतीने विजय दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवशाहीर रायगड भूषण वैभव घरत यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावार पोवाडे सादर केले. तर शिवव्याख्याते अॅड. विनय दाभाडे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महत्वाचे व्याख्यान झाले. तर शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाषणे, नृत्य सादर केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नरेश पाटील, खोपोलीचे माजी नगरध्यक्ष डॉ. सुनील पाटील, खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, वावोशी पोलीस स्टेशनचे संतोष आवटी, शिवदुर्ग मित्र मंडळ अध्यक्ष सुनील गायकवाड, चावणी ग्रामपंचायतचे सरपंच बाळासाहेब आखाडे, उपसरपंच सुखदेव भोसले, सदस्य रमेश चव्हाण, सदस्या संगीता चिंचावडे, प्राची पाटील, सखू वाघमारे, ग्रामस्थ गणेश चव्हाण, पोलीस पाटील समीर पाटील, बाळू बुधलेकर, गणपत चव्हाण ,पांडुरंग पाटील, चेतन पाटील, हिरामण पाटील, हरेश पाटील, ऋतिक नांदुस्कर, किशोर डफाळ, मयूर डफळ धनराज डफाळ, प्रदीप भवुड, राजू डफाळ, आकाश पाताडे, नरेश पाटील, बापू पाटील, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र पुकळे, आनंदराव कचरे, जयंत भवुड हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष गुरुनाथ साठीकर, रुपेश शेडगे, संदीप चिंचावडे, आकाश चिंचावडे, हरिभाऊ कोंडभर, गणपत कोंडभर आदिसह अनेक शिवप्रेमींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.






