बाळासाहेबांची शिवसेना दारुण पराभव
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत ६ सदस्यपदाकरिता व सरपंच पदाकरीता निवडणुक जाहीर करण्यात आली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने ६उमेदवार रिंगणात उतरविले. तर शेतकरी कामगार पक्षांनी ३जागी उमेदवार दिले तर ३ठिकाणी उमेदवारी न दिल्याने बाळासाहेबांची शिवसेनेचे तीन्ही उमेदवार बिनविरोध आले. तिन सदस्यपदाकरीता रविवारी १८डिसेंबर २०२२रोजी निवडणूक घेण्यात आली. आज या निवडणुकीची मतमोजणीला सुरवाती पासून शेतकरी कामगार पक्षाचे तिन्ही उमेदवारांनी आघाडी घेऊन दणदणीत विजय संपादन करुन बाळासाहेबांची शिवसेनाचा दारुण पराभव केला.
विजयी उमेदवार (१)जयंता बाळकृष्ण कासार ,(२)उषा भालचंद्र जाळगांवकर, (३) शहिनदा सरफराज अहमद कडु हे तिन्ही उमेदवारांच शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते -बाळकृष्ण कासार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा उपचिटणीस तथा माजी नगरसेवक -मनोज भगत, तालुका चिटणीस -अजित कासार, राहिल कडु, धर्माजी हिरवे, रामचंद्र कासार, दशरथ वाजे गणपत काते, प्रशांत कोदेरे, श्रीकांत वार्गे, संतोष जमनू, संदीप गोणभरे, सचिन पाटील आदिंसह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.