गणेशभक्ताने साकारला नवी मुंबई विमानतळाचा देखावा

। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी प्रकल्पग्रस्त ठाम असल्याचे आजही पाहायला मिळत आहे. सध्या गणेशोत्सव सुरू झालेला आहे. दरम्यान, आसूडगाव येथील माजी सरपंच विजय भोपी यांनीदेखील घरगुती गणेशाची आरास दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा फलक असलेला देखावा साकारलेला आहे. देखावा पाहिला तर प्रकल्पग्रस्त भूमीपुत्र आपल्या भूमिकेवर आजही ठाम आहे, हे सिद्ध होते. विकसित भूखंडाची योजना दिबांनी त्यावेळी सरकारला मानायला लावली नसती, तर आज इथला प्रकल्पग्रस्त दूर कुठेतरी फेकला गेला असता. इथल्या लोकांमध्ये दिबांबद्दल असलेला जिव्हाळा यातून निर्माण झाला आहे. आपल्या भाकरीवर दिबांचं नाव असल्याची जाणीव असल्यानं विमानातळाला त्यांच्या नावाचा होत असलेला आग्रह दिसून येतो.

Exit mobile version