| पनवेल | प्रतिनिधी |
खारघरमध्ये धाडसी नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्याला पकडण्यात नागरिकांना यश आले आहे. ही घटना खारघर उपनगरातील शिल्प चौक येथे घडली. या घटनेमुळे वाहनाची काच फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा शोध लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कामोठे येथील सेक्टर 18 येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक हे त्यांच्या मजुरांचे वेतन देण्यासाठी बँकेतून रोख रक्कम काढून खारघर उपनगराच्या दिशेने त्यांच्या वाहनातून जात होते. यावेळी त्यांचा मित्र त्यांच्यासोबत होता. यादरम्यान एका दुचाकीवरून अनोळखी व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याचा त्यांना संशय आला. खारघर येथील शिल्प चौक येथील छत्रभूज इमारतीशेजारी त्यांचे वाहन थांबून ते खाली उतरले. त्यानंरत ते वाहनात बसत असताना एकजण स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने वाहनाची काच फोडून रोख रकमेची पिशवी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर लगेच व्यावसायिक व त्याच्या मित्राने चोरट्यावर झडप मारली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे चोराला पकडण्यात यश आले असून त्यांना खारघर पोलिसांकडे देण्यात आले.
सतर्कतेमुळे चोराला पकडण्यात यश

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606