विहूर गुरचरण जमिनीचा वाद आता न्यायालयात

लढाई लढण्याचा ग्रासमथांचा निर्धार
मुरुड | वार्ताहर |
विहूर येथील सरकारी गुरचरण जमिनीचा वाद आता न्यायालयात लढला जाणार आहे.तसा निर्धार ग्रामस्थानी केला असून, त्यासाठी मूळ असणार्‍या गुरुचरण जमिनीचे स्वरूप बदलून खाजगी व्यक्तीला बहाल करणार्‍या सर्व अधिकारी यांची चौकशी व्हावी तसेच हि जमीन मिळवण्यासाठी आम्ही न्ययालयीन लढाई सुद्धा लढणार असल्याचे प्रतिपादन विहूर येथील ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत आपला निर्णय जाहीर केला आहे.
विहूर गुरुचरण जमीनींबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विहूर ग्रामस्थांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी विहूर सरपंच निलीशा दिवेकर,तंटा मुक्ती अध्यक्ष इकरार मोदी, दत्तात्रेय नाकती, सज्जाद उलडे, ग्रामपंचायत सदस्य फैसल उलडे, नथुराम दिवेकर, रमेश दिवेकर,संतोष पोटले,परेश तांबे,गजनफ़र पांगारकर,ईस्रार पांगारकर,इम्तियाज मलबारी,योगेंद्र गोयजी,माजी सरपंच अजित कासार,मनोज भगत तलहा कौचंकौल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जुना सातबारा सर्वे नंबर 20/1 यामध्ये 9 हेक्टर असणारी जमीन हि गावकर्‍यांसाठी उपयोगी असताना महसूल व भूमी अभिलेख कार्यालयाच्या संगतमताने हीच जागा नवीन सातबारा बनवून गट नंबर 111 दाखवून खाजगी व्यक्तीला बहाल करण्यात आली आहे विहूर ग्रामपंचायत च्या मालमत्ता रजिस्टर नंबर 27 मध्ये सन 1960 साली जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वेय सदरील सर्वे नंबर 20/1 हि जमीन मिळकत सरकारी गुरचरण असल्याचे व सदरची जमीन मिळकतील कब्जेदार म्हणून ग्रामपंचायतीची नोंद करण्यात यावी असे आदेश करण्यात आलेले होते.
वास्तविक पहाता विहूर मध्ये नवाब सरकारच्या मालकीच्या सर्वे नंबर 18/11 ,20/1 अ,21/6 ,21/7 या मिळकती वारसाने नवाबांना मिळाल्या आहेत.परंतु सर्वे नंबर 20/1 अशी सरकारी गुरचरण नोंद असलेली जमीन नवाबाच्या नावे कशी झाली यात काय गौडबंगाल आहे.हे आम्ही ग्रामस्थ शोधून काढणार आहोत.जेव्हा एकत्रीकरण योजना अमलात आली तेव्हा सर्वे नंबर 20/1 गुरचरण असणारी जमीन महसूल व भूमी अभिलेख यांच्या दप्तरी हीच जागा गट नंबर 111 बनवण्यात आली आहे.गुरचरण जमीचे स्वरूप बदलून खाजगी व्यक्तीला का देण्यात आली याचा ग्रामस्थ विविध माहिती अधिकार टाकून आमचा अभ्यास सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली .
सन 1925 पासून भूमी अभिलेख यांच्या कायमदर तक्त्त्याप्रमाणे सर्वे नंबर 20/1 हि जागा सरकारी गुर चरण अशी नोंद आहे.या जमिनी व्यतिरिक्त पाच जमिनी सुद्धा ग्रामपंचातला 10 अटीशर्तींच्या अधीन राहून विहूर ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या आहेत.परंतु नेमकी हीच जमीन खाजगी व्यक्तीला देण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांनी आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

मोजणीसाठी आमदारांची शिफारस
गट नंबर 111 ची मोजणी कामी देण्यात आलेल्या 27-04-2021 रोजीच्या मोजणी अर्जामध्ये सह हिस्सेदार करीम मोदी हे मयत असताना व नाजिया दिवेकर हे परदेशात असताना त्यांच्या खोट्या सह्या असल्याचे निदर्शनास आणून सदर मोजणीस ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन सुद्धा विद्यमान आमदारांनी या मोजणीसाठी शिफारस पत्र सुद्धा दिले असल्याचे ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत निदर्शनास आणून दिले आहे.

सरकारी अधिकारी यांच्याकडून न्याय न मिळाल्यास आम्ही न्यायालयात दाद मागणार असून,शासकीय गुरचरण जमीन श्रीमंतांना देण्याचा घाट रचला जात आहे.कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी लाठी चार्ज करावा लागत आहे.शासनाची जमीन असून सुद्धा शासन बाजू घेत नाही.
निलीशा दिवेकर, विहूर सरपंच

Exit mobile version