। हमरापूर । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील तांबडशेत शाळेच्या शिक्षिका विजया विठोबा पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल पेण तालुका प्राथमिक शिक्षक वर्धापन दिनानिमित्त गुणवंत शिक्षक पुरस्कार, आदर्श शाळा पुरस्कार आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा पेण शहरातील आगरी समाज सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेडी, गट शिक्षणाधिकारी शर्मिला शेंडे, शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद पाटील, जिल्हा सल्लगार किशोर पाटील, पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक विठोबा पाटील, अमरचंद पाटील, आदिनाथ पाटील, मोहन भोईर, नंदकुमार थवई, सरिता पाटील, अरुणा देवी मोरे, राजेंद्र पाटील, प्रवीण पाटील, सदानंद म्हात्रे यांच्यासह शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुक्यातील तांबडशेत जि. प. प्राथमिक शाळेच्या शिक्षिका विजया पाटील यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत शिक्षिका हा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तालुक्यातील इतर शाळांतील गुणवंत शिक्षक तसेच आदर्श शाळांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.







