म्हसळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संघ स्वयंसेवकांकडून संचलन तसेच शस्त्रपूजन करण्यात आले. 1925 साली विजयादशमीच्या दिवशी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी हिंदू समाजाचे संघटन करून राष्ट्राला परमवैभवाप्रत नेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. यास 100 वर्ष पूर्ण झाली असून संघ शताब्दी वर्षाच्या निर्मित्ताने धावीर मंदिर पटांगण येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते विलास यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संघशताब्दी पर्वात पर्यावरण, समरसता, कुटुंब प्रबोधन, नागरी कर्तव्य आणि स्वबोध या पाच महत्त्वाच्या बिंदूंच्या अधारावर सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्व स्वयंसेवक कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले. तसेच, विजयादशमीचा उत्सव आणि संचलन यातून संघाचे एक आश्वासक, कल्याणकारी आणि सज्जनशक्तीचे रूप समाजासमोर येते, असे मत व्यक्त करण्यात आले.

Exit mobile version