। डोंबिवली । प्रतिनिधी ।
विजयदशमीच्या निमित्ताने दरवर्षी आपापल्या रेल्वेच्या डब्यात विजयादशमी सण जोरदार पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही साई भजन मंडळ (डोंबिवली-दिवा) यांनी अति उत्साहीत आणि जल्लोषात साजरा केला. यावेळी वारकरी परंपरा जपत या मंडळाचे अध्यक्ष अंकुश बोरगे यांनी ‘एक देश, एक गणवेष’ असे दाखवून दिले. यावेळी भजन मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप कदम यांनी भजनाच्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध करून परिसर दुमदुमून टाकला होता. यावेळी प्रदीप कदम, अंकुश बोरगे, विकास हळदवणेकर, उमेश घरवे, राकेश गायकवाड, प्रविण मेढेकर, विजय वर्दम, अशोक शिंदे, सचिन बेलकर, विनय विचारे, विजय बेलकर, दिपक कांबळे, प्रशांत नारकर, सुदर्शन सांगले, नितीन देवकर, दिंगबर बच्छाव, रवी फाटे आणि महिलांचा समावेश होता.







