आज विचारांचे सोने की आरोपांची राळ?

शिवसेनेचा दसरा मेळावा, संघाचा विजयादशमी मेळावा
। मुंबई/नागपूर । प्रतिनिधी ।
विजयादशमी अर्थात दसरा. साडेतीन शुभ मुहुर्तापैकी एक.याच दिवशी महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांचे वार्षिक मेळावे आयोजित केले जातात.गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीने हे मेळावे ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते.पण यावेळी हेच मेळावे जाहीरपणे घेतले जाणार असल्याने या मेळाव्यातून विचारांचे सोेने बाहेर येणार की आरोपांची राळ याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा दसर्‍याला शिवतीर्थावर आयोजित केला जातो.ही परंपरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुुरु केली होती.ती आजही कायम आहे.यावर्षी हा मेळावा जाहीर घेण्याची तयारी शिवसेनेने सुरु केलेली आहे.यावर्षी हा मेळावा शिवसेनेसाठी महत्वाचा ठरणार आहे.कारण लवकरच मुंबईसह अन्य 10 महापालिकांच्या निवडणुका होत असल्याने या मेळाव्यातून शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेमके काय बोलतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रथेप्रमाणे विजयादशमी मेळावा आयोजित केला आहे.भगवान गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही मनातील भावना व्यक्त करण्यासाठी मेळावा घेणार असल्याचे जाहीर केलेले आहे.

Exit mobile version