विजयश्री पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

साने गुरुजी संस्कार साधना पुणे या संस्थेने विजयश्री राजेंद्र पाटील यांना 23 नोव्हेंबर रोजी आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पनवेल तालुक्यातील शांतीवन येथील अण्णासाहेब सहस्रबुद्धे अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत विजयश्री राजेंद्र पाटील या शिक्षिका आहेत. 2000 पासून त्या सेवेत रुजू होऊन 25 वर्षे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत. तालुक्यातील आदिवासी समाजातील ठाकूर जमातीच्या स्त्रियांचे जीवन, आदिवासी भागातील पाणीटंचाई, आदिवासी स्त्रियांमध्ये सिकलसेल एक गंभीर समस्या या विषयावर अभ्यासपूर्ण शोध निबंध त्यांनी लिहीले आहेत. तसेच जिल्ह्यातील आदिवासी समाजातील स्त्रियांच्या जीवनमानावर शिक्षणाचा झालेला परिणाम या विषयावर संशोधन कार्य सुरू आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version