| पाताळगंगा | प्रतिनिधी |
चौक वावंढळ येथील तडफदार युवक म्हणून विक्रम गायकवाड यांच्याकडे पाहिले जाते. ते राजकारण व समाजकारण यांची सांगड घालून जनसेवा करण्यासाठी सातत्याने अग्रेसर असतात. विशेष म्हणजे त्यांचे आजोबा सुद्धा शेकापक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता होते. त्यामुळे विक्रम गायकवाड यांची शेकापच्या खालापूर तालुका पुरोगामी युवक संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. खालापूर तालुका नगराध्यक्ष संतोष जंगम, शेकापचे किशोर पाटील यांच्यासह इतर प्रमुखांच्या उपस्थित त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गायकवाड यांच्या कामाची चळवळ विलक्षणीय असून त्यांना देण्यात आलेले हे पद निश्चितच पक्ष वाढविण्यासाठी उपयोगी ठरेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.







