रसायनी पोलिसांकडून गावठी हातभट्टी उध्वस्त

। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली ठाकूरवाडीत डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गावठी हातभट्टी अड्डा उध्वस्त केला.
यावेळी तयार दारु, बनविण्याचे साहित्य, रसायन तसेच गावठी हातभट्टीची तयार दारु पोलिसांना सापडली.दारु बनविण्यासाठी असलेले ड्रम पोलिसांनी पलटी करुन हातभट्टी अड्डा उध्वस्त केला. यावेळी पोलिसांना 30,500 रुपये किमतीचे एकुण निळया रंगाचे पाच प्लॅस्टिकचे 200 लिटर क्षमतेचे ड्रम प्रत्येक ड्रममध्ये 200 लिटर प्रमाणे दारु तयार करण्याचे तांबडया रंगाचा उग्र वास येत असलेले मिश्रीत द्रव्य अ‍ॅल्युमिनियमचा सतेला लाकडी चाटु जुना वापरता,प्लॅस्टीकची नळी जुनी वापरता चार पत्राच्या टाक्या सफेद रंगाचा कॅन त्यामध्ये गावठी हातभट्टीची तयार दारु,एक पजाची टाकी त्यामध्ये 10 लीटर दारु तयार करण्याचे तांबडया रंगाचा उग्र वास येत असलेला मिश्रीत द्रव्य असा माल मिळून आला. याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार पाटील अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version