| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील दिघाटी गाव येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करत असताना तालुका पोलिसांनी धडक कारवाई करून एकाला अटक केली आहे. पोलिसांनी हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट केले असून, याप्रकरणी सखाराम मुकुंद पाटील (57) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन टाकळे, पोलीस हवालदार संतोष शिंदे व त्यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. येथील जंगलात गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. त्यावेळी प्लॅस्टिक ड्रममध्ये आंबवलेले रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. तसेच एलपीजी गॅस, शेगडी, अल्युमिनियमचे भांडे, गावठी दारू जप्त केली आहे.