गावठी दारुच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त

| वसई | वार्ताहर |

वसई पूर्वेतील तिल्हेर येथील जंगलात गावठी दारू बनवणार्‍या हातभट्ट्यांवर मांडवी पोलिसांनी कारवाई करून अनेक हातभट्ट्या उद्ध्वस्त करून अडीच लाखाचा दारू बनवण्यासाठी लागणारा मुद्देमाल पोलिसांनी जाळून नष्ट केला. पोलिसांनी याबाबत एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली तर ही मोहीम आणखीन तीव्र करणार असल्याचे मांडवी पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी सांगितले.

विधानसभेच्या निवडणूक पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी यासाठी गावठी दारू बनवणार्‍या हातभट्ट्यांवर वसई विरार मिरा भाईंदर पोलीस आयुक्तलयाने कारवाई करण्याची मोहीम आखली आहे. यात वसई तालुक्यात या आठवड्यात अनेक ठिकाणी कारवाई करुन लाखोचा मुद्देमाल जाळून नष्ट केला आहे. यामध्ये तिल्हेर येथील हातभट्ट्या जंगलाच्या मध्ये असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी पोलिसांना एक दीड तास पायपीट करावी लागली. मात्र या कारवाईची खबर लागतात अनेक आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या हातभट्ट्या कोणाच्या आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

Exit mobile version