| सोलापूर | प्रतिनिधी |
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पीडित कुटुंबियांनी न्यायासाठी पोलिसांत धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखला करता येत नसल्याचे सांगतिले. पीडित ग्रामसेवकाच्या कुटुंबियांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे, काही काळ बार्शी ग्रामीण रुग्णालयात चांगलाच तणाव झाल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही, तुम्ही रितसर जबाब नोंदवा, असे येथील पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी म्हटले. मात्र, कुटुंबीय गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने जीवन संपवलं
