| रसायनी | वार्ताहर |
मावळ लोकसभा मतदारसंघातील इंडिया/महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे मावळ लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्याअगोदर गावभेठी दौरा सुरु केला असून ख-या अर्थांने प्रचाराला सुरुवात केल्याचे पहायला मिळत आहे. वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील नढाल येथील जागृत देवस्थान कळंबा देवीचे दर्शन घेवून श्रीफळ वाढवून नढाळहून गावभेठी प्रचाराला सुरुवात केली. तेथून वरोसे समाज मंदिर, लोधिवली गाव, रिस गाव, कांबे गाव, रिसवाडी येथे भेट देवून नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर तळेगाव वाडी, तळेगाव, पानशिल गाव, मोहोपाडा आदीवासी वाडी, चांभार्ली गाव, दुर्गामाता कॉलनी, खाने आंबिवली, आळी आंबिवली, नविन पोसरी, मोहोपाडा बाजारपेठेतून शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन सभेच्या माध्यमातून सांगता करण्यात आली.
या प्रचाराच्या नेतृत्वाची धुरा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सांभाळली. यावेळी इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. गद्दारांना गद्दारी काय असते याचा धडा शिकविण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते व सामान्य मतदार सज्ज झाला असून आता त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब करण्यासाठी वाट पहावी लागणार असल्याचे संजोग वाघेरे-पाटील यांनी सांगितले. परिसरातील शेतक-यांचा विषय, तरुणांना नोक-या, कामगारांना न्याय, महिलांना स्वयंरोजगार आदी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी बोलताना सांगितले. यावेळी महाविकास आघाडीचे मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.