विहूर बांधकामप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील विहूर मधील गट नंबर 111 या जागेत सी.आर.झेड. व एन.डी.झेड. कायदा झुगारून खुलेआम बांधकाम होत असल्याबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले असून, हा बांधकाम प्रकरणी संबंधित जमीन धारक व विकासक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून तसा ठराव नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला आहे. तसेच याबाबत भूमिका घेत तहसीलदार व पोलीसांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे.

विहूर ग्रामपंचायतीची 30 नोव्हेंबर रोजी तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा नुकतीच 12 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आली. यावेळी विषय नं. 6 :- अध्यक्षांच्या परवानगीने येणार्‍या आयत्या वेळचे विषयांचा विचार करणे. ठराव नं. 109 (7) :- विहूर गट नं.111 या जागा जमिनीतील सी.आर.झेड. व एन.डी. झेड. कायद्याचे उल्लंघन होऊन अनधिकृत व बेकायदेशीर सुरू असलेले बांधकामाबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विहूर येथील गट नं. 111 या जागा जमिनीतील सदरची जागा समुद्रकिनारी लगत आहे. त्या जागेत तैजून निसार हन्सोजी ही व्यक्ती हस्ते व परहस्ते अनधिकृत व बेकायदेशीरपणे आरसीसी सिमेंट कॉलम, ब्लॉकचे व वॉल कंपाऊंड व मातीचे ढिग, खोदकाम व इतर व्यावसायिक प्रकारचे बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. हे बांधकाम सीआरझेड, एनडीझेड कायदा झुगारून खुलेआम व राजरोसपणे करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सदर जमिनीचा बहुतांश भाग हा सीआरझेड व एनडीझेड कायद्याखाली येत असल्यामुळे या जागेत कोणते ही व्यावसायिक बांधकाम करणे हे पूर्णपणे निषिद्ध आहे,असल्याचे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.

सदरची व्यक्ती कायद्याचे उल्लंघन करून व कोणत्याही विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम करीत असून वरील- क्षेत्र कायद्याचे उल्लंघन करीत आहे. तसेच सदरचे जागे बाबत प्रकरण ग्रामस्थांमार्फत न्यायालयात न्याय निर्णयासाठी प्रलंबित असून न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे सदरचे चालू असलेले सर्व प्रकारचे अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम थांबविणे कामी व सदरचे व्यक्तीवर नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई होणे कामी तसे सबंधित महसूल विभागाकडे कळविणेत यावे. असा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत केला आहे. यावर प्रशासन कोणती उचित भूमिका घेते. याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version