वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थाचा पहरा

| पनवेल | वार्ताहर |

थंडीचा कहर वाढल्यांनंतर अनेक ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने येथील ग्रामस्थ आता सतर्क झाले असून, त्यांनी रात्रीचा जगता पहारा देण्यास सुरु केला आहे. त्याचप्रमाणे अनेक गावांमध्ये फेरीवाल्यांसह अनोळखी इसमांना गाव बंदी करण्यात आली आहे.

पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत्या घरफोड्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. मागील कित्येक दिवसांपासून चोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गावाची सुरक्षा स्वतः करण्याची वेळ आली असून, अनेक गावांमधील तरुण हे गावाच्या सुरक्षिततेसाठी रात्री दहा वाजल्यापासून पहाटे पर्यंत पहारा देण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच चिरनेर गावामध्ये सुद्धा चोरीचा प्रयत्न झाला होता, असा प्रकार आपल्या गावात घडू नये यासाठी अनेक ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. या चोरटयांनी बंद घरे, बंगले, फार्म हाऊस हे हेरले असून त्या घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत आहेत. त्या दृष्टीकोन ग्रामस्थांनी जागता पहारा देण्यास सुरुवात केली आहे. पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु आहेत. त्या ठिकाणी लागणारे कामगार हे परप्रांतीय आहेत. अनेकांचा आता पत्ता सुद्धा ठेकेदाराकडे नसतो, त्यामुळे या परप्रांतीयांचे चांगलेच फावले असून ते दिवसा कामाच्या ठिकाणचे जवळपासची बंद घरे हेरून ठेऊन रात्री तेथे चोरी करतात या पूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या घटना पनवेल तालुक्यात घडल्या आहेत व पोलिसांनी अश्या आरोपीना जेरबंद सुद्धा केले आहे.

Exit mobile version