दहिवलीत मगरीचा मुक्त संचार

। माणगाव । वार्ताहर ।

माणगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून मगरींचे वाढते अस्तित्व समोर येत आहे. काळ नदी आणि स्थानिक ओढ्यांमध्ये दिसणार्‍या मगरी आणि मगरींची पिल्ले आता नागरी वस्ती आणि रस्त्यावर दिसू लागली आहेत. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दहिवली गावातील रस्त्यावर 1.90 मीटर लांबीची महाकाय मगर गावच्या रस्त्यावर मुक्त संचार करताना ग्रामस्थांनी पाहिली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनीच मगरीला पकडले व दोरीने बांधून वन विभागाच्या ताब्यात दिले.

वनखात्याचे वनक्षेत्रपाल अनिरुद्ध ढगे, वनरक्षक अक्षय मोरे यांनी याठिकाणी येऊन मगरीला ताब्यात घेऊन तालुक्यातील गोरेगाव येथे काळ नदीत तिला सोडले. तालुक्यात मगरींचा संचार वाढला असल्याने सर्वत्र भीतीदायक वातारण पसरले आहे. याअगोदर दीड महिन्यापूर्वी रामदेव स्टीलजवळ मुंबई-गोवा महामार्ग ओलांडताना एका मगरीच्या पिलाला अज्ञात वाहनाची धडक लागल्याने त्यात तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसर्‍यांदा काळ नदीकिनारी मगर येऊन बसल्याचे अनेकांनी पाहिले, त्यामुळे तालुक्यात मगरींचे वाढते अस्तित्व समोर आले आहे.

Exit mobile version