वावोशीतील न्यु बाँम्बे कंपनीच्या धुळीच्या प्रदुषणाने ग्रामस्थ हैराण

कंपनीवर कारवाईसाठी ग्रामपंचायत सदस्या तृप्ती पांचाळ यांचा उपोषणाचा इशारा

| खोपोली | संतोषी म्हात्रे |
खालापूर तालुक्यातील ग्रामीण जांभिवली ग्रामपंचायत हद्दीत असंख्य कारखाने असून आतील एक असणारी न्यू बाँम्बे कारखान्यातील धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने नागरिक या कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करित असताना या कंपनीवर कडक कारवाई व्हावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य तृप्ती महेश पांचाळ यांनी आक्रमक पवित्रा घेत गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना दि.23 डिसेंबर रोजी निवेदन देत कारवाईची मागणी केली असून या कंपनीवर कडक कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही जांभिवली ग्रामपंचायत सदस्या तृप्ती पांचाळ यांनी प्रशासनाला दिला आहे.
खालापूर तालुक्यातील जांभिवलीमधील न्यू बाँम्बे कंपनीच्या राखेमुळे संपूर्ण जांभिवली गावांचे आरोग्य धोक्यात आले असून सर्व ग्रामस्थ या राखेमुळे चिंतेत सापडल्याचे पाहायला मिळत आहे, तर अलिकडच्या येथील काळात वाढत्या काही कारखानदारीमुळे व न्यू बाँम्बे कंपनीमधून निघणाऱ्या प्रदूषणावर कोणाचेही वचक न राहिल्यामुळे कंपनी प्रशासन आपल्या मर्जीप्रमाणे प्रदूषण करत असून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करीत असल्याने कंपनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त होत असताना या कंपनीमधून निघणाऱ्या राखेवर व प्रदूषणावर योग्य ती कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य तृप्ती महेश पांचाळ यानी आक्रमक पवित्रा घेत गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना 23 डिसेंबर रोजी निवेदन देत कारवाईची मागणी केली. जर या कंपनीवर योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही सदस्या तृप्ती महेश पांचाळ यांनी दिला आहे.
न्यू बॉम्बे कंपनीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून कंपनीमधून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे जांभिवली गावातील नागरिकांसह आजूबाजूच्या परिसराचे आरोग्य धोक्यात आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. तर कंपनी मधून बाहेर पडणारी राख गावातील लोकांच्या घरामध्ये येत असून कंपनीवर योग्य ती कारवाई करावी, जर कंपनीवर योग्य ती कारवाई न झाल्यास उपोषण तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत सदस्या तृप्ती महेश पांचाळ यांनी दिला आहे.

Exit mobile version