| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक वनीकरण संस्थेमध्ये सुरू असलेले अनधिकृत बांधकाम थांबवावे, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी विडसई व वाफेघर येथील ग्रामस्थ सुधीर वाघमारे मंगळवार (ता.10) पासून पाली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. त्यांच्या मागण्या शनिवारी (ता.14) सायंकाळी पाचव्या दिवशी मान्य झाल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी सांगितले, की वसुधा सोसायटीमध्ये सुरू असलेले ते बांधकाम थांबविण्यात आले आहे. मागण्या मान्य झाल्याने उपोषणकर्ते व ग्रामस्थांनी तहसीलदारांचे आभार मानले. यावेळी सुधीर वाघमारे, वाफेघर, विडसई व खवली ग्रामस्थ, नायब तहसीलदार दिलीप कोष्टी आदी उपस्थित होते.