| पनवेल | वार्ताहर |
चिंध्रण गावात होणार्या नवीन एमआयडीसी प्रकल्पाविरोधात तसेच नैना प्रकल्पाविरोधात चिंध्रण गावातील शेतकर्यांचा निषेध मोर्चा ग्रामस्थ आणि महिलांनी काढला होता.
एमआयडीसी क्षेत्रातील मोबदला न घेतलेल्या शेतकर्यांना योग्य भाव आणि पूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत एमआयडीसी क्षेत्रात कोणतेही जमिनीचे भराव तसेच रस्त्याचे काम करून देणार नाही, ही ठाम भूमिका शेतकर्यांनी घेतली होती. यावेळी मोर्चामध्ये अनिल ढवळे (मा. सरपंच शिवकर), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किरण कडू, ग्रामपंचायत सदस्य मनोज कुंभारकर, जीवन पाडेकर, संतोष देशेकर, सुरेश पाटील तसेच चिंध्रण गावातील ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.