गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र यावे

आमदार जयंत पाटील यांचे आवाहान ताजपूर येथे कार्यक्रम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर गावातील नागरिकांनी एकत्र असणे गरजेचे आहे.गावातील वादामुळे गावाचा विकास होत नाही, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील ताजपूर येथे एका कार्यक्रमात केले आहे.

अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील ताजपूर, भोनंग, नांगरवाडी या गावांनी कायमच पाटील कुटुंबियांवर आणि शेतकरी कामगार पक्षावर प्रेम केले आहे. या गावांचे प्रेम आमच्यावर कायमचं राहिले आहे. त्यामुळे ही गावे कायम एक राहिली पाहिजेत. कोणीही येईल आणि दोन भावात भांडण लावेल ते दिवस गेले. आता समजुतीने एक राहिले पाहिजे. गावाचा विकास हवा असेल तर गाव एक असणं फार महत्त्वाचं आहे. मंदिर बांधण्याच्या निमित्ताने सर्व गाव एक झाला. ताजपूर गाव एक झाल्यानंतर सर्वाधिक आनंद झाला. असेच सर्व गावे अंतर्गत वाद विवाद बाजूला सारून एक झाले तर गावाचा विकास नक्कीच होईल. सर्व ग्रामस्थांनी मान सन्मान दिला त्या बद्दल आमदार जयंत पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

Exit mobile version