डंपिंग ग्राउंडमुळे ग्रामस्थ त्रस्त

| पाली /वाघोशी | प्रतिनिधी |

पाली नगरपरिषद हद्दीतील मढाली-शिळोशी रोडवर असलेला डंपिंग ग्राउंड हळूहळू रस्त्यावर आला आहे. या रस्त्यावरून दोन्ही गावांतील ग्रामस्थ तसेच विद्यार्थी पायी प्रवास करत आहेत. मात्र, तिथली दुर्गंधी इतकी भयंकर आहे की, नागरिकांना चालत जाणे अथवा बाईकवरून वारंवार जाणे ही कठीण होत आहे. पाली शहरातील कचराकुंड्या कमी करून फिरत्या घंटागाड्यांचा प्रयोग यशस्वी ठरला होता, त्याबद्दल सर्वत्र कौतुक ही झाले. मात्र, शहराबाहेर हलवलेल्या डंपिंग ग्राउंडमुळे आजूबाजूच्या गावांच्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी पाली नगरपरिषदेकडे विनंती केली आहे की, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा किंवा डंपिंग ग्राउंड मुख्य रस्त्यापासून कमीत कमी 50 फूट अंतरावर हलवावा. नगराध्यक्षांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version