| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटना सदस्यपदी चौल येथील विनय म्हात्रे याची निवड करण्यात आली आहे. शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत त्याला सदस्यपदाचे मानपत्र प्रदान करण्यात आले.
विनय म्हात्रे हा उच्चशिक्षित असून, सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतो. चौल परिसरातील तरुणवर्गाचा त्याला मोठा पाठिंबा असल्याने शेकापच्या संघटनात्मक वाढीसाठी त्याचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. पक्षाच्या कार्याला गती देण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी शेकापचे कार्यकर्ते अमित फुंडे, हेमंत पाटील, राजेंद्र ठाकूर, भालू म्हात्रे, अभिजित वाळंज आदी उपस्थित होते.







