। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील कुरुळ गावी राहणारे विनायक देवजी भोसले यांचे शनिवारी 20 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी पहाटे चार वाजता निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 91 वर्षांचे होते. अलिबागच्या जिल्हा न्यायालयात त्यांनी 36 वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी घरीच राहणे पसंत केले. त्याकाळात त्यांनी 1994 पासून असंख्य काविळ रुग्णांना आयुर्वेद औषध देत त्यांना बरे केल्याने रायगड जिल्ह्यातून अनेक काविळ रुग्ण त्यांच्याकडे औषधासाठी येत असत. विनायक देवजी भोसले हे मुळचे अलिबागचे राहणारे असून, त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह अलिबाग तालुक्यातील कुरुळ गावी राहण्यास गेले. स्वभावाने ते मनमिळावू, सतत हसता चेहरा, सर्वांशी आपुलकीने वागणारे, आपुलकीने चौकशी करणारे, त्यांच्या घरात जाणार्यांचे मनापासून स्वागत करणारे, त्याचबरोबर ते धार्मिक वृत्तीचेही होते. त्यांच्यावर वरसोलीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांचे नातेवाईक तसेच त्यांना मानणारा वर्ग उपस्थित होता. त्यांच्या पश्चात चार मुले व एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दहावा विधी सोमवारी दि.29 नोव्हेंबर रोजी कुरूळ तलाव येथे होणार आहेत. तसेच तेरावे विधी गुरुवारी दि. 2 डिसेंबर रोजी कुरूळ येथील राहत्या घरी करण्यात येणार असल्याचे भोसले कुटुबियांकडून सांगण्यात आले.