मराठा समाजाचा आवाज हरपला – शरद पवार

मुंबई | प्रतिनिधी |
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज अपघातामध्ये निधन झालं. खोपोलीजवळच्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. विनायक मेटे यांचं निधन वेदनादायी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळी उठवल्यानंतर पहिलीच बातमी मेटेंच्या निधनाची ऐकायला मिळाली. धक्का बसला. मेटे यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. गेली अनेक वर्ष विनायक मेटे यांनी महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी केली. ते मराठा आरक्षण प्रश्नावर कायम आवाज उठवायचे. मेटे यांनी मराठा समाजासाठी उल्लेखनीय काम केले. ते सामाजिक प्रश्नाची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे. विनायक मेटे यांच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र उमद्या नेत्याला मुकला
आमदार दीपक केसरकर यांनी देखील विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विनायक मेटे यांच्या मृत्यूची बातमी दुर्दैवी असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. विनायक मेटे यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवला. मेटे यांचं मराठा समाजासाठी मोठं योगदान आहे. विनायक मेटे यांच्या निधनाने महाराष्ट्र एका उमद्या नेत्याला मुकला असल्याचे केसरकर यांनी म्हटलं आहे

Exit mobile version