। हरियाणा । वृत्तसंस्था ।
लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मिर या चार राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामधील हरियाणा राज्याची निवडणूक ही 1 ऑक्टोबरला होणार आहे. हरियाणातील सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकीचे वातावरण असताना प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगट यंदाच्या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यावर स्वत: विनेश फोगाट हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या फायलमध्ये धडक मारणारी विनेश फोगाट राजकारणात एन्ट्री करणार का? सर्वांना उत्सुकता लागली आहे. मी राजकारणात येणार्या बातम्यांबद्दल मला स्वत:ला काही माहिती नाही. गेल्या काही दिवसांपासून मी दबावात आहे. तुम्हाला आशा आहे, पण देव मला जो मार्ग दाखवेल तो मी निवडेल. राहिला प्रश्न कुस्तीचा, मी कुस्ती करू शकेल का? असं विनेश फोगाट म्हणाली. यावेळी तिला डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष संजय सिंह यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला.
विनेश फोगाटने राजकारणामध्ये नाही आलं पाहिजे, असं संजय सिंह म्हणाले. यावर पत्रकारांनी विनेशला प्रश्न केल्यावर ती म्हणाली, वादग्रस्त प्रश्न विचारू नका, मला नाही माहित संजय सिंग कोण आहेत? त्यासोबतच कुस्तीमधील निवृत्ती घेण्यावर, जेव्हा माझे मन मला सांगेल. त्यावेळी मी पुढे काय करायचं ते ठरवेल, असं विनेश फोगाट म्हणाली. विनेश फोगाट जिंद येथील टोल प्लाझा येथील शेतकरी हुतात्मा स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आली होती.
विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटामध्ये जाणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. विनेशचे फायनलआधी 100 ग्रॅम वजन वाढल्याने त्याला अपात्र ठरवण्यात आलं होतं. याविरूद्ध देशवासियांसह विनेशनेही आवाज उठवला होता. कांस्य पदक तरी देण्यात यावं. यासाठी क्रीडा लवादाच्या न्यायालयासमोर युक्तिवाद केला होता. मात्र, हा दावा फेटाळून लावला.
दरम्यान, हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये हरियाणात 1 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.