। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील पळस्पे गावातील विनिता गवंडी हिने हरियाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या सेव्हन स्टँडर्ड ऑलिम्पिक गेम्स या स्पर्धेतील महिला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. विनिता गवंडी ही पळस्पे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मोहन गवंडी यांची सुकन्या असून सुवर्णपदक पटकावलेल्या विनिताचे स्वागत व अभिनंदन करण्यासाठी पळस्पे गावातील ग्रामस्थ व पनवेल परिसरातील क्रिडा प्रेमी उत्सुक आहेत. विनिता हिने सेव्हन स्टँडर्ड ऑलिम्पिक गेम्स या स्पर्धेतील महिला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याने सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच पळस्पे गावाचे सरपंच अनिल ढवळे, आदर्श शिवकर, इतिहास संशोधक वसंत कोळंबे, सुधाकर लाड यांनीही विनिता गवंडी हिचे अभिनंदन केले आहे.