ग्रामविकास अधिकारीपदी विनोद चांदोरकर

। रसायनी । वार्ताहर ।

खालापूर तालुक्यासह रसायनी पाताळगंगा परिसरातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारीपदी विनोद चांदोरकर यांची निवड झाली आहे. त्यांनी नुकताच वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचा कार्यभार स्विकारला आहे.

दरम्यान वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी पदावर रुजू झालेले विनोद चांदोरकर यांनी 13 वर्ष ग्रामसेवक म्हणून काम पाहिले. सन 2006 पासून ग्रामविकास अधिकारी म्हणून कोन, सावळे, कामोठे, पेंधर, रोडपाली, कर्जंत, पनवेल, साजगाव आदी ग्रुप ग्रामपंचायतीचा चोख कारभार सांभाळला आहे. त्यांच्या कार्यावर सन 2011 साली सावळे ग्रामपंचायतीला यशवंतराव अभियानाअंतर्गत पुरस्कार प्राप्त झाला आहे. ग्रामविकास अधिकारी विनोद चांदोरकर यांच्या कामाची प्रशंसा होत असून कामात चोख अधिकारी म्हणून चर्चा आहे. त्यांची वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी पदाच्या सेवेत रुजू झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version