| ठाणे | प्रतिनिधी |
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती खालावल्याने त्याला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळकुम येथील प्रगती हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यावर आवश्यक चाचण्या करण्यात आल्या असून क्रिकेटरवर सध्या आयसीयूत उपचार सुरु आहेत.
क्रिकेटरला नेमकं काय झालंय?
किडनीशी संबंधित आजारामुळे लघवी इन्फेक्शनच्या समस्येनं क्रिकेटर त्रस्त आहे. याशिवाय ताप आणि डोकेदुखी यासारखी लक्षणंही त्याच्यात दिसून येत आहेत. शनिवारी रात्री माजी क्रिकेटरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिटी स्कॅन करण्यात आले असून त्याचे रिपोर्ट्स हे संध्याकाळपर्यंत येतील. सध्याच्या घडीला त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. अशी माहिती प्रगती हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेश सिंह यांनी दिली आहे. ते आपल्या पत्नीशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलतात, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. कांबळीचा तो व्हिडिओ पाहून अनेकांना बसला धक्काकाही दिवसांपूर्वीच क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात क्रिकेटचे गुरु द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात सचिन तेंडुलकरसह विनोद कांबळीही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते. याच कार्यक्रमात विनोद कांबळीची प्रकृती त्याला साथ देत नाही, ते समोर आले होते. अडखळत बोलणं अन् अधाराशिवाय उभे राहणेही कांबळीला जमत नाही, हे पाहून अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर विनोद कांबळीनं एक मुलाखतही दिली. ज्यात त्याने वेगवेगळ्या समस्येचा सामना करत असल्याचे सांगितले होते. या परिस्थितीतही सचिन सोबत आहे, त्याने रुग्णालयातील खर्च उचलला, अशी माहितीही त्याने दिली होती.