श्रीवर्धन किनारी नियमांची पायमल्ली

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

नाताळच्या सुट्ट्या सुरु असल्यामुळे आणि 31 डिसेंबरही तोंडावर आल्याने सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांची तुफान गर्दी आहे. श्रीवर्धन तालुकाही याला अपवाद नाही. दरम्यान, श्रीवर्धन समुद्रकिनारी पर्यटकांच्या वाढत्या गर्दीबरोबरच नियमभंगाचे प्रकारही समोर येत आहेत. समुद्र किनारी चारचाकी वाहने पाण्याच्या जवळील वाळूवर नेण्यास स्पष्ट मनाई असतानाही काही अति उत्साही पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करत आपली वाहने थेट वाळूवर नेल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. यामुळे किनाऱ्याच्या सुरक्षिततेसह पर्यावरणालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाने कठोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

Exit mobile version