रिक्षाचालकांकडून नियमांची पायमल्ली

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

रिक्षाचालकांना आपल्या गणेवशावरील बॅचबरोबर बिल्ला ओळखपत्र लावणे बंधनकारक आहे. परंतु, नवी मुंबईतील रिक्षाचालकांना या नियमाचे वावडे असल्याचे दिसत आहे.

नवी मुंबईत 32 हजारांच्या घरात अधिकृत रिक्षांची संख्या आहे. या रिक्षा चालकांना आरटीओकडून ओळखपत्र वितरित करण्यात आले आहे. या ओळखपत्रावर रिक्षा चालकाचा फोटो, नाव, पत्ता, बॅच, क्रमांक व इतर तत्सम माहिती देण्यात आलेली आहे. हे ओळखपत्र प्रवाशाच्या नजरेत येईल, अशा पद्धतीने गणवेशाच्या भागावर लावणे बंधनकारक आहे. मात्र, नवी मुंबईतील रिक्षा चालकांनी या नियमाला केराची टोपली दाखविली आहे. यासंदर्भात आरटीओचे अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता बेशिस्त रिक्षाचालकांवर आरटीओकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version