वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले

| पनवेल । वार्ताहर ।

केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करून नवीन कायदा आणला आहे. या कायद्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत वाढ केली. त्यामुळे पनवेल परिसरातील 2,734 वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उंल्लघन चांगलेच महागात पडले आहे.

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहनने कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यात केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार झालेल्या वाहतुकीच्या नियमांमधील बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन कायद्यानुसार बेशिस्त वाहनचालकांवर लावण्यात येणारा दंड तसेच चालक परवाने निलंबित होण्याचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल ते डिसेंबर 2021 या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये पनवेलमध्ये 2,350 एवढ्या विक्रमी वाहन परवाने निलंबित करण्यात आले होते. तर 2022 मध्ये पनवेल प्रादेशिक परिवहनने आत्तापर्यंत 2,734 वाहन परवाने निलंबित केले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांची या धडक कारवाईमुळे विना परवाना वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.

वाहनपरवान्यासाठी धावाधाव
वाहनचालक परवाना काढण्यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहनकडे धाव घेतली आहे. त्यामुळे नवीन परवाने काढण्यासाठी आगाऊ स्लॅाट बुक केले जात आहेत. त्यामुळे पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या वाहन परवाना काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे.

राज्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासोबत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिस, आरटीओमार्फत ही कारवाई केली जात आहे. अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम तोडत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे.

गजानन ठोंबरे
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

सिग्नल जंप – 1,354
मोबाईल टॅाकिंग – 431
ड्रिंक ड्राईव्ह – 32
ओव्हर स्पीड – 735
विनाहेल्मेट – 182

Exit mobile version