| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना चरी येथे बुधवारी सकाळी घडली आहे. याप्रकऱणी आरोपीविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पाटील असे या आरोपीचे नाव आहे. मागील दोन वर्षापासून पिडीत 40 वर्षीय महिलेशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न ते करीत होते. बुधवारी(दि.17) सकाळी घर कामासाठी जात असताना आरोपीने दुचाकीवर येऊन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पिडीत महिलेने पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस नाईक एन. एस वाघमारे करीत आहेत. सचिन पाटील यांच्या विरोधात यापुर्वी पोयनाड व पेण पोलीस ठाण्यात फसवणूक व अन्य प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.







